Diveagar : रायगडमधील दिवेआगारात तब्बल 9 वर्षांनी सुवर्णगणेशाची प्रतिष्ठापना
रायगड जिल्ह्यातल्या दिवेआगर इथल्या प्रसिद्ध गणपती मंदिरात आज ९ वर्षांनी पुन्हा सुवर्णगणेशाची स्थापना होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App९ वर्षांपूर्वी म्हणजेच २४ मार्च २०१२ रोजी दरोडेखोरांनी दोन सुरक्षारक्षकांची हत्या करून सुवर्णमूर्ती आणि सोनं पळवून नेलं होतं.
दरोडेखोरांनी विकलेलं सोनं पोलिसांनी छडा लावेपर्यंत वितळवलं गेलं होतं.
कायद्याच्या कचाट्यात अडकलेलं हे सोनं राज्य सरकारकडे सोपवण्याचा निर्णय न्यायालयानं दिला.
त्यानंतर मंदिरात पुन्हा सुवर्ण गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा मार्ग मोकळा झाला.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सुवर्णगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
मूर्ती चोरीला गेल्यानंतर 9 वर्षांनी मंदिरात पुन्हा सुवर्ण गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना होणार
गणेश भक्तांसाठी महत्त्वाची असणारी अंगारकी चतुर्थी आज मंगळवारी आहे.
गेले दोन वर्ष कोरोनामुळे लोकांना अंगारकी चतुर्थी दिवशी आपल्या लाडक्या गणरायाचं दर्शन घेता आलेलं नाही.