Shravan 2021 : आज शेवटचा श्रावणी सोमवार, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची आरास

Pandharpur Temple

1/9
आज पवित्र श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस, म्हणजेच शेवटचा श्रावणी सोमवार. (PHOTO : @PandharpurVR/Twitter)
2/9
या निमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. (PHOTO : @PandharpurVR/Twitter)
3/9
भक्त युवराज मुचलंबे यांनी विठ्ठल चरणी फुल सजावटीची सेवा अर्पण केली आहे. (PHOTO : @PandharpurVR/Twitter)
4/9
आज सोमवती अमावास्या आणि श्रावणी सोमवार असल्यानं हरिहराचं प्रतीक असलेल्या विठ्ठल मंदिरात अत्यंत मनमोहक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. (PHOTO : @PandharpurVR/Twitter)
5/9
विठ्ठल मंदिराच्या चौखांबी आणि सोळखांबी मध्ये रंगसंगती साधत फुलांचे पडदे, फुलांची झुंबरं आणि मंडप बनविण्यात आला असून विठ्ठल रुक्मिणी समोर फुलांच्या आकर्षक रांगोळीच्या पायघड्या देखील घालण्यात आल्या आहेत. (PHOTO : @PandharpurVR/Twitter)
6/9
झेंडू, गुलछडी, गुलाब, लिली अशा विविध रंगांच्या फुलांचा या सजावटीसाठी वापर केला असून विठ्ठल मंदिरातील कर्मचारी असलेल्या शिंदे बंधू यांनी ही आकर्षक फुल सजावट साकारली आहे. (PHOTO : @PandharpurVR/Twitter)
7/9
(PHOTO : @PandharpurVR/Twitter)
8/9
(PHOTO : @PandharpurVR/Twitter)
9/9
(PHOTO : @PandharpurVR/Twitter)
Sponsored Links by Taboola