शिवसेना आमदार उदयसिंह राजपूत यांच्या मुलाच्या लग्नात 'कोरोना'च्या नियमांचा फज्जा

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. नाशिकमध्ये देखील ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचं भरारी पथक देखील सक्रिय झालं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सरकार आणि स्थानिक पातळीवर निर्बंध घातले जात आहे.

पण दुसरीकडे कन्नड विधानसभेचे शिवसेना आमदार उदयसिंह राजपूत यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला तुफान गर्दी झाली होती.
नाशिकच्या गंगापूर रोडवरील बालाजी लॉन्समध्ये सायंकाळी हा विवाह सोहळा पार पडला.
विशेष म्हणजे या गर्दीतच शिवसेना खासदार संजय राऊत, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील हजेरी लावली.
नेतेमंडळीच निर्बंध लावतात आणि अशा कार्यक्रमांमध्ये तेच नियम गुंडाळून ठेवतात.
त्यामुळे नियम फक्त सामान्य जनतेसाठीच मर्यादित आहेत का ? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.
लग्नाला खुल्या जागेत केवळ 200 पाहुण्यांना बोलावण्याची मुभा असताना आणि नियम मोडल्यास तात्काळ गुन्हे दाखल होत असताना मंत्र्यांना नियमावली नाही का असा सवाल आता विचारण्यात येत होता.
या सोहळ्याला वऱ्हाड्यांसह राज्य सरकारमधील मंत्री, आमदार तसेच कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते