PHOTO : भारत जोडो यात्रेत दाखल होताच राहुल गांधींनी आदित्य ठाकरेंची गळाभेट घेतली

शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आज राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांच्यासोबत काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आदित्य ठाकरे यांच्यासोबत सोबत शिवसेना नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांच्यासह इतर अनेक सहकारी आणि शिवसैनिक यात्रेत सहभागी झाले होते.

आदित्य ठाकरे यांनी हिंगोली येथे आज राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रा केली.
संविधान आणि लोकशाहीसाठी आम्ही लढत आहोत असे सांगत आदित्य ठाकरे यांनी भारत जोडो यात्रेतून भाजवर हल्लाबोल केलाय.
यात्रे दरम्यान, राहुल गांधी आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर हात टाकून चालत होते.
आदित्य ठाकरे यात्रेत सहभागी होताच राहुल गांधी यांनी त्यांची गळाभेट घेतली.
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरे यांच्यासोबत मोठ्या प्रमाणत शिवसैनिक देखील सहभागी झाले होते.
राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांनी यात्रेदरम्यान खूप वेळ एकमेकांसोबत संवाद साधला.
काँग्रेसची भारत जोडी यात्रा तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून 7 सप्टेंबर रोजी सुरू झाली.
तामिळनाडूनंतर ही पदयात्रा केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणामार्गे महाराष्ट्रात पोहोचली आहे. ही यात्रा राज्यातील 15 विधानसभा आणि सहा लोकसभा मतदारसंघातून जाणार आहे. यादरम्यान 382 किमी अंतरचा प्रवास होईल.