Shivaji University : मातीतील पायांना स्वप्न पाहून सत्यात उतरण्याची प्रेरणा देणारे कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ!
लोकल टू ग्लोबल आणि मातीतील पायांना स्वप्न पाहून सत्यात उतरण्याची प्रेरणा देणारे कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ हीरक महोत्सव साजरा करत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवाजी विद्यापीठाची स्थापना 18 नोव्हेंबर 1962 मध्ये झाली.
कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील 34 संलग्न महाविद्यालयांसह 5 पदव्युत्तर विभाग आणि 14 हजार विद्यार्थ्यांसह विद्यापीठाचा श्रीगणेशा झाला.
1962 पासून सुरु झालेला हा प्रवास आता जागतिक स्तरापर्यंत जाऊन पोहोचला आहे.
तत्कालिन राष्ट्रपती डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते विद्यापीठाचा उद्घाटन सोहळा पार पडला होता.
या ऐतिहासिक विद्यापीठाची संकल्पना राजाराम महाविद्यालयाचे तत्कालिन प्राचार्य डाॅ. बाळकृष्ण यांनी मांडली होती.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, नामदार बाळासाहेब देसाई आदींच्या नेतृत्वाने कोल्हापुरात शिवाजीव विद्यापीठाचा पाया रचला गेला.
डाॅ. अप्पासाहेब पवार हे शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होत.
आजघडीला विद्यापीठाला युजीसीकडून कॅटेगरी-1 दर्जा बहाल करण्यात आला आहे.
शिवाजी विद्यापीठात आज 277 महाविद्यालये असून 13 संलग्न संस्था, 10 अध्यासन केंद्रे, 14 अभ्यास व संशोधन केंद्रे, 12 स्वायतत्ता दर्जा मिळाेलेली महाविद्यालये आहेत. सध्या 2 लाख 56 हजार 242 विद्यार्थी शिकत आहेत.