PHOTO: शिवसैनिकानं उभारलं बाळासाहेब ठाकरेंचं मंदिर, कसं आहे हे मंदिर
Balasaheb Thackeray Temple: नांदेडमध्ये एका सामान्य शिवसैनिकांनी स्वखर्चातुन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे मंदिर उभारले आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील इटग्याळ गावात हे मंदिर उभारण्यात आलं आहे ज्याची जिल्हाभरात चर्चा होतेय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुखेड तालुक्यातील इटग्याळ या छोट्याशा गावात वातव्यास असणाऱ्या व अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातून येणाऱ्या संजय इटग्याळकर या तरुणास बालपणापासूनच बाळासाहेबांचे प्रखर हिंदुत्व,मराठी माणूस व हिंदुत्व यासाठीचा त्यांचा लढा या विषयी नेहमीच आकर्षण राहिले आणि तो शिवसेनेकडे ओढला गेला
बी.ए पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर उदरनिर्वाहासाठी व शिवसेना बाळासाहेबांना जवळून पाहता यावे त्यांच्या सानिध्यात राहता यावे यासाठी त्याने 2000 मध्ये थेट मुंबई गाठली.
त्या ठिकाणी उदरनिर्वाहासाठी मुंबई येथील अंधेरी स्थित जानकी देवी पब्लिक स्कूल येथे मुलांना कराटे प्रशिक्षण देण्याचे काम स्वीकारले. एक शिवसैनिक म्हणून शिवसेनेत काम सुरू केले.दरम्यान घरच्या परिस्थितीमुळे व कुटुंबाच्या जिम्मेदारीमुळे 2007 साली संजयने पुन्हा आपले गाव इटग्याळ गाठले.
परंतु या दरम्यान त्याने बाळासाहेब व शिवसेनेचे काम मात्र चालू ठेवले.एवढेच नाही तर दरवर्षी न चुकता ते आतापर्यंत दसरा मेळाव्यास आपली हजेरी लावतात.
या दरम्यान बाळासाहेबांच्या निधनानंतर बाळासाहेबांचे विचार त्यांचा सामन्या विषयीचा लढा, त्यांची हिंदुत्वाविषयीची जागरूकता ही तरुण पिढीपर्यंत पोहोचावी यासाठी 2013 साली त्याने आपल्या वडिलोपार्जित जागेत बाळासाहेबांचा पुतळा उभारला.
ज्या ठिकाणी 2013 पासून आतापर्यंत एक ज्योत नेहमी तेवत असते. परंतु बाळासाहेबांचा हा पुतळा उभारल्यानंतर ऊन, वारा, पाऊस या नैसर्गिक आपदांमुळे पुतळ्याचे नुकसान होऊ नये यासाठी त्याच जागेवर बाळासाहेबांचे मंदिर उभारण्याचे ठरवले.
संजय उदरनिर्वाहासाठी देगलूर, मुखेड, उदगीर याठिकाणच्या तरुणांना कराटे प्रशिक्षण देतात. पण कोरोना व लॉकडाऊनमुळे तेही बंद झाले आणि आर्थिक आवक बंद पडली. त्यासाठी त्यांनी वडिलोपार्जित 2 एकर जमीन विक्री करून व तब्बल 14 लाख रुपये खर्च करून बाळासाहेबांचे सुंदर व सुबक असे मंदिर उभारलंय. जवळपास एक एकर परिसरात विस्तीर्ण अशा जागेत संजय इटग्याळकर यांनी हे मंदिर उभारले असून याठिकाणी मोफत कराटे प्रशिक्षण केंद्र, व्यायामशाळा आणि सांस्कृतिक सभागृह उभारून या परिसरातील तरुणांना त्याचा लाभ मिळावा हा त्यांचा मानस आहे.