Shiv Jayanti 2023 : प्रतापगडावर शिवाजयंतीचा उत्साह, शिवभक्तांची मोठी गर्दी
प्रतापगडावर शिवाजयंतीचा मोठा उत्साह पाहयला मिळत आहे. शिवभक्तांनी गडावर मोठी गर्दी केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रतापगडावरील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी आहे.
संपूर्ण राज्यभर छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली जात आहे. सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर हा शिवाजयंतीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे.
image 4
प्रतापगडावर छत्रपती शिवरायांची अश्वरुढ मूर्ती आहे. या मूर्तीला अभिवादन करण्यासाठी शिवभक्तांची गर्दी होत आहे.
प्रतापगडावरील तुळजा भवानी मातेच्या मूर्तीला दागिने आणि अलंकार घालण्यात आले.
प्रतापगडावरील तुळजा भवानी मातेच्या दर्शनासाठी देखील भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
छत्रपती शिवरायांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी केलेल्या पराक्रमाच्या यशोगाथा सर्वांना प्रेरणा देते. ही यशोगाथा आज देखील महाराजांच्या पराक्रमाची आणि शौर्याची आणि त्यांच्या गनिमीकाव्याची आठवण करून देते.
महाराज आणि अफजलखान या दोघांच्या भेटीचा साक्षीदार ठरलेला प्रतापगड आज देखील त्या जाज्वल्य स्मृती आपल्या हृदयात साठवून दिमाखात उभा आहे
प्रतापगड गिरिदुर्ग प्रकारातील गड असून सह्याद्रीच्या रांगांमध्ये जावळीच्या खोऱ्यात घनदाट जंगलात प्रतापगड हा किल्ला बांधण्यात आला आहे.