Shiv Jayanti 2022 : गेवराईत शिवरायांना अनोखी मानवंदना; साकारली भव्य कलाकृती, ड्रोननं टिपली मनमोहक दृश्य
Shiv Jayanti 2022 : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची उद्या 19 फेब्रुवारी रोजी जयंती आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा राज्यभर उत्साह आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बीडच्या गेवराई शहरामध्ये दगड आणि चून्यातून शिवाजी महाराजांची अतिशय रेखीव चित्ररेखा साकारण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह पंडित यांच्या संकल्पनेतून हे रेखाचित्र गेवराई शहरातील आर बी अट्टल महाविद्यालयाच्या प्रांगणात मध्ये साकारण्यात आला आहे. यासाठी चार दिवस या कलाकाराने मेहनत घेऊन हे चित्र रेखाटले आहे..
150 बाय 100 फूट जागेवर ते म्हणजे एकूण पंधरा हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये हे रेखाचित्र बनवण्यात आले आहे.
यासाठी 17 ब्रास बेसॉल्ट स्टोन, 250 किलो चुना आणि 160 किलो काळा कलर वापरून ही चित्रकृती साकारण्यात आली आहे
स्वाभिमानी युवा ब्रिगेडच्या वतीने गेवराई करांसाठी डोळ्याचे पारणे फेडणारे हे रेखाचित्र साकारले गेवराईमधला आर्टिस्ट उद्धेश पघळ याने.
ही सर्व छायाचित्र ड्रोनच्या माध्यमातून बलराज खोजे गेवराई यांनी टिपली आहेत.