Sangola Sheep: सांगोल्यातील मोदींचा मेंढा पुन्हा चर्चेत, वर्षाला देतोय कोटभर रुपये
सांगोल्यामधील बाबू मेटकरी यांच्या मोदी या मेंढ्याची देशभर चर्चा झाली होती. माडग्याळ जातीच्या या मेंढ्याला 71 लाखाची मागणी झाल्याने मुलाचा सर्जा आणि नंतर मोदी नामकरण झालेला मेंढा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमोदी मेंढ्याचे कोरोना काळात निधन झाले. आता त्याचे पिल्लू असलेल्या सोन्याला आता सोन्याच्या भावात मागणी येऊ लागली आहे .
विशेष म्हणजे या सोन्या सोबतची पिल्ले 10 ते 15 लाखाला एक याप्रमाणे विकली होती.
मात्र बाबू यांनी सोन्या आणि त्याच्या जोडीचे एक पिल्लू ठेवले आणि आज त्यालाच 55 लाखांची किंमत आली आहे .
गेल्यावर्षी एका पात्राच्या घरात राहणाऱ्या बाबू मेटकरी यांना मोदींच्या एकाच पिल्लाने आलिशान बंगला बांधून दिला आणि जमीन देखील खरेदी करून दिली.
माडग्याळ जातीची तशी शेकडो मेंढ्या महाराष्ट्र आणि कर्नाटक भागात दिसतात. मात्र यातील जातिवंत मेंढे खूपच कमी आहेत.
यातीलच मेटकरी यांचा सर्जा हा मेंढा देशभरात प्रत्येक बाजारात अव्वल येऊ लागल्याने त्याला मोदी हे नामकरण केले होते
मोदीचा मेंढा असलेला सोन्या आता पुन्हा चर्चेत आला आहे.
. तो केवळ दीड वर्षाच्या वयात असून त्याला 55 लाखाला मागणी आल्याने पुन्हा एकदा बाबू मेटकरी चर्चेत आले आहेत .
सहा फूट लांब, मोठा गळा, चंद्रकोरीसारखे नाक असा देखणा सोन्या केवळ दीड वर्षाच्या वयात मोदीप्रमाणे रुबाबदार दिसू लागला आहे.