Sangmeshwar Landlide : संगमेश्वर तालुक्यातील चाफवली गावात डोंगराचा भाग खचला, मोठ्या भेगा
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील चाफवली गावातील काही ठिकाणी डोंगर भाग खचला असून मोठ मोठ्या भेगाही पडल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतसेच रस्त्यालाही अती वृष्टीमुळे भेगा पडल्या आहेत. असाच काही भाग काही वर्षा पूर्वीही खचला होता. यावेळी मात्र आणखी काही ठिकाणी भाग खचला आसल्याचे पाहणी दरम्यान लक्षात आले.
चाफवली भटाचा कोंड,आडवी पेणी, या वाड्यातील दोनगर भागाला मोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत. भटाचा कोंड या भागात डोंगराला काही वर्षा पूर्वीही अशाच भेगा पडल्या होत्या.
या वर्षीही अती वृष्टीमुळे पुन्हा भेगा पडल्या आहेत.तर आडवी पेणी,भागात या वर्षी जमीन फाटली आहे.भटाच्या कोंडाकडे जाणार रस्ता ही फाटला आहे.रस्त्याला फेगा पडल्या आहेत.
चाफवली गावातील डोंगराला भगदाडे पडलेल्या भागातील वाडीतील दोन घराना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.महसूल आणि ग्रामपंचायत कार्यालयाकडून नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
पावसाचा जोर थोडा मंदावला आहे, मात्र वाढल्यास या भागातील काही घराना धोका निर्माण होवू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
चाफवलीतील काही घरे ही भीतीच्या छायेखाली असून ज्या डोंगराना भेगा गेल्या आहेत त्या भेगामधून पाण्याचा प्रवाह वाहतो आहे.
या पाण्याच्या प्रवाहामुळेच डोंगराला भेगा गेल्याचे म्हटले जात आहे. पावसाचा जोर वाढल्यास डोंगर सरकू शकतो असे जाणकारांचे म्हणणे आहे.