Rain Alert Today:राज्याच्या दक्षिणेकडे तीव्र वादळी वारे, गारपीटीचा अंदाज, संपूर्ण राज्यात आज मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

येत्या दोन ते तीन दिवसात अवकाळी पावसाचा इशारा कायम असून हवामान विभागाने संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे तीव्र इशारा दिले आहेत.

IMD alert

1/7
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपीटीची हजेरी लागलीय .वाढत्या तापमानात आलेल्या पावसामुळे दिलासादायक वातावरण झालं आहे .
2/7
आज पुणे सातारा सांगली कोल्हापूर धाराशिव लातूर बीड अहिल्यानगर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून कोकण विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे .
3/7
येत्या दोन दिवसात अवकाळी पावसाची शक्यता कायम असून गारपीटीची ही शक्यता आहे .
4/7
दरम्यान आज राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान कमी झाले असून नागरिकांना उन्हाच्या झळांपासून दिलासा मिळालाय .
5/7
मात्र अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी लागल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली .शेतकऱ्यांचेही नुकसान झाले आहे .
6/7
पुणे हवामान विभागाचे प्रमुख के एस कुसाळकर यांनी येत्या चार ते पाच दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीचा अंदाज दिलाय .
7/7
राज्याच्या दक्षिणेकडे तीव्र वादळ आले असून आज नाशिक विभागात अवकाळी पावसाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता आहे .
Sponsored Links by Taboola