रेल्वेत रील्स बनवाल,तर जेलमध्ये जाल; बेकायदेशीर व्हिडिओ बनवणाऱ्यांवर रेल्वेचं लक्ष
गेल्या काही दिवसांत रेल्वेत आणि रेल्वे परिसरात रील्स करणं , सेल्फी व्हिडिओ काढणे अशा विविध प्रकारे व्हिडीओ रेकॉर्ड करणे हे प्रकार वाढलेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळे सुरक्षेचा प्रश्न काही प्रवाशांनी उपस्थित करत असे प्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती.
त्यामुळे बेकायदेशीर व्हिडीओ बनवणाऱ्यांवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
धावत्या ट्रेनमध्ये किंवा सेल्फी घेणे , रील्स बनविणे किंवा प्लॅटफॉर्मच्या बाजूला प्रवास करताना व्हिडीओ रेकॉर्ड करणे , एखाद्याचा जीव धोक्यात घालणे , रेल्वे कायद्यानुसार दोषी मानले जाते.
त्यामुळे याविरोधात कलम 145 आणि 147 नुसार कारवाई करण्यात येणार आहे.
तसंच रील्स किंवा व्हिडीओ काढल्यास एक हजार रुपये दंड आणि सहा महिने तुरुंगवासही होऊ शकतो अशी माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ . शिवराज मानसपुरे यांनी दिलीय.
अनेक तरुण मंडळी रेल्वे रुळावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतात.
या अपघाताने रेल्वे रुळाच्या परिसरात व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता
रेल्वे प्रशासनाने कठोर पावले उचलून रेल्वे परिसरात कुणीही व्हिडिओ वा सेल्फी काढण्यासाठी फिरकणार नाही याची खबरदारी घेण्याची मागणी जोर धरत होती.