Karnala Fort : कर्नाळा किल्ल्याचे अवशेष ढासळण्याची शक्यता, पर्यटकांना किल्यावर बंदी

वन्यजीव विभागामार्फत कर्नाळा किल्ला परिसरात सूचना फलक लावून किल्ल्याच्या वरच्या टप्प्यातील सुमारे 500 मीटर अंतराच्या परिसरात पर्यटकांना बंदी करण्यात आली आहे. 

raigad karnala fort Photo

1/10
Raigad News Updates:  मुंबई गोवा हायवेलगत (Mumbai God Highway Updates) असलेला कर्नाळा किल्ल्यावरील (Karnala Fort)  सुळक्यासह बांधकामाला धोका निर्माण झाला आहे.
2/10
किल्ल्याच्या भिंतींना भेगा गेल्या असून पायऱ्या आणि प्रवेशद्वार ढासळला असल्याने किल्ल्याच्या वरील परिसरात पर्यटकांना बंदी करण्यात आली आहे. 
3/10
मुंबईपासून अवघ्या तासाभराच्या अंतरावर असलेलं कर्नाळा पक्षी अभयारण्य हा पर्यटकांचा आकर्षण आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेला कर्नाळा किल्ला हा मुंबई- गोवा हायवेलगत असलेला निसर्गरम्य परिसर असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देशी - विदेशी पक्षांचा वावर दिसून येतो.
4/10
यामुळे या अभयारण्यात ट्रेकिंग आणि भटकंतीसाठी हजारो पर्यटक हे सुट्टीच्या दिवशी आणि पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात हजेरी लावत असतात. 
5/10
पांडव सुळका पर्यटकांसाठी आकर्षण आहे तर सुमारे साडेतीन किलोमीटरचा टप्पा असलेल्या कर्नाळा अभयारण्यात अंगठ्याच्या आकाराचा उंच मोठा सुळका दिसून येतो.
6/10
यामुळे मुंबई - गोवा हायवेवरून दिसणारा सुमारे 50 मीटर उंचीचा हा पांडव सुळका पर्यटकांसाठी आकर्षण बनला आहे.
7/10
दरम्यान, कर्नाळा किल्ल्याच्या वरच्या टप्प्यात सुळका, पाण्याच्या टाक्या आणि आणखी काही बांधकामं आहेत.
8/10
त्यातच किल्ल्यावरील बांधकामाला धोका निर्माण झाला असून किल्ल्याची तटबंदी ढासळलेल्या अवस्थेत आहे. किल्ल्यावर प्रवेश केल्यावर वाड्यांचे अवशेष दिसून येत असून त्याची स्थिती बिघडली आहे.
9/10
यामुळे किल्ल्याच्या देखभालीची आवश्यकता निर्माण झाली आहे.  किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या सुस्थितीत नाहीत. कर्नाळा किल्ल्यावर पाहणीसाठी गेलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या सुस्थितीत नसल्याचे लक्षात आले. तर, पायऱ्या चढून गेल्यावर पुढे असलेल्या दगडी दरवाजाच्या भिंती देखील सरकल्याचे निदर्शनास आले आहे.
10/10
वन्यजीव विभागामार्फत या परिसरात सूचना फलक लावून किल्ल्याच्या वरच्या टप्प्यातील सुमारे 500 मीटर अंतराच्या परिसरात पर्यटकांना बंदी करण्यात आली आहे.  कर्नाळा किल्ल्याचे अवशेष ढासळण्याची शक्यता कर्नाळा किल्ला हा पुरातत्व विभागाकडे असल्याने किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी ही पुरातत्व विभागाची आहे. यामुळे, पुरातत्व विभागाने ही बाब गांभिर्यानं न घेतल्यास किल्ल्याचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कर्नाळा किल्ल्याचे अवशेष ढासळण्याची शक्यता असल्याने पर्यटकांना या परिसरात बंदी करण्यात आली आहे.
Sponsored Links by Taboola