PHOTO : दुर्गराज रायगडला राष्ट्रपतींची भेट; 'भवानी तलवार' आणि 'शिवराई होन'ची प्रतिकृती भेट

president ramnath kovind

1/10
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज दुर्गराज रायगडला भेट दिली. (फोटो सौजन्य : दिपक सपाटे, राजघराण्याचे छायाचित्रकार)
2/10
खासदार संभाजीराजेंनी देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना महाराष्ट्राचं वैभव असलेल्या आणि स्वराज्याचा साक्षीदार असलेल्या रायगडाच्या भेटीसाठी येण्याचं निमंत्रण दिलं होतं.
3/10
तब्बल 35 वर्षींनी भारताचे राष्ट्रपती किल्ले रायगडावर येत आहेत. या आधी पंतप्रधान इंदिरा गांधी 1981 साली किल्ले रायगडावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी राजसदरेत मेघडंबरी उभारण्याची सूचना केली होती.
4/10
इंदिरा गांधींच्या सूचनेनुसार मेघडंबरी 1985 साली बांधून पूर्ण झाल्यावर तिच्या लोकार्पण सोहळ्यास तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंह किल्ले रायगडावर आले होते.
5/10
या दौऱ्यादरम्यान ते रायगडावर हेलिकॉप्टरने जाणार होते. मात्र, शिवप्रेमींनी रायगडावर हेलिकॉप्टर उतरवण्यास विरोध दर्शवला. त्यामुळे राष्ट्रपतींनी रायगडावर जाण्याचा मार्ग बदलला आणि त्यांनी रोपवेने रायगडावर जाण्याचा निर्णय घेतला.
6/10
राष्ट्रपती रामनाथ कोविंद किल्ले रायगडावर येणार असल्यामुळे किल्ले रायगड आणि परीसराला लष्करी छावणीचं स्वरूप आलं होतं. राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी विविध स्तरांवर सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती.
7/10
शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या स्वराज्याच्या सार्वभौमत्वाचे व संपन्नतेचे प्रतीक असलेल्या 'शिवराई होन'ची प्रतिकृती राष्ट्रपतींना भेट देण्यात आली.
8/10
राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे आपल्या परिवारासह रायगडवर उपस्थित होते, त्यांनी शिवछत्रपतींना वंदन केलं.
9/10
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबत राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपस्थित होते. त्यांचं स्वागत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केलं.
10/10
यावेळी खासदार संभाजीराजे यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भवानी तलवारीची प्रतिकृती भेट दिली. (फोटो सौजन्य : दिपक सपाटे, राजघराण्याचे छायाचित्रकार)
Sponsored Links by Taboola