PHOTO : पिसावर शिवरायांचं चित्र, सिंधुदुर्गातील चित्रकार अक्षय मेस्त्रीकडून मानवंदना
Shivaji Maharaj Painting
1/6
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज तिथीप्रमाणे सर्वत्र साजरी केली जात आहे. राज्यभरातील शिवभक्तांमध्ये आनंदी आणि उत्साहाचे वातावरण आहे.
2/6
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमधील गव्हाणे गावचा युवा चित्रकार अक्षय मेस्त्री याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती औचित्य साधून पक्षाच्या पिसावर चित्र रेखाटले आहे.
3/6
अॅक्रलिक कलरच्या माध्यमातून हे चित्र रेखाटले असून महाराजांना चित्रातून मानवंदना दिल्या आहेत.
4/6
अक्षय मेस्त्रीने अर्ध्या तासात पिसावर शिवरायांचं चित्र साकारलं
5/6
अक्षय मेस्त्री कायमच आपल्या कलेने सगळ्यांना आश्चर्यचकित करत असतो. याआधी त्याने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आपट्याच्या पानावर चित्र रेखाटलं होतं. तर कार्तिकी एकादशी निमित्त सुपारीवर विठ्ठलाची विविध रुपे साकारली होती
6/6
आज तिथीनुसार साजरी केली जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त अक्षय मेस्त्रीने पिसावर चित्र साकारुन त्यांना अनोखी मानवंदना दिली आहे.
Published at : 21 Mar 2022 09:42 AM (IST)