PHOTO : बंडखोर आमदार मुंबईत परतले, चोख पोलीस बंदोबस्तात हॉटेलवर पोहोचले
शिवसेनेतून बंड करुन उद्धव ठाकरे सरकार पडण्यासाठी कारणीभूत ठरलेले बंडखोर आमदार आज मुंबईत परतले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्याच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला असून मुंबई विमानतळ ते ताज प्रेसिडेंट हॉटेल या मार्गिकेवर मुंबई पोलिसांनी विशेष कॉरिडॉर तयार केला आहे.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे. या बंडखोर नेत्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील उपस्थित होते.
बंडखोर आमदारांना घेऊन विमान मुंबईत आल्यानंतर एबीपी माझाचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी त्या विमानातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांशी संवाद साधला.
मुंबईत आल्यानंतर आम्ही सर्वजण आनंदी असल्याचं या बंडखोर आमदारांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.
या आमदारांच्या स्वागतासाठी भाजपचे आमदार प्रसाद लाड हे विमानतळावर उपस्थित होते.
या ठिकाणी शेकडोच्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आमदार ज्या मार्गाने गेले त्या मार्गावर विशेष कॉरिडॉर निर्माण करण्यात आला होता.
तीन विशेष बसच्या माध्यमातून हे आमदार एयरपोर्टमधून बाहेर पडले.
मुंबई पोलीस उपायुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी यावेळी सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली आणि पोलिसांना योग्य त्या सूचना केल्या.