PHOTO : अभिनेते सयाजी शिंदे यांनी वाचवली 60 वर्ष जुनी दोन वडाची झाडं
परभणीच्या गंगाखेड परळी या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी या मार्गावरील मोठ्या प्रमाणावर जुने झाड तोडले जात होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसह्याद्री देवराईचे संस्थापक तथा अभिनेते सयाजी शिंदे यांनी या वृक्षतोडीला विरोध करत हे झाड न तोडता दुसरीकडे लावण्याची मागणी केली होती.
या अनुषंगाने आज स्वतः सयाजी शिंदे यांनी शासकीय यंत्रणा आणि त्यांच्या खाजगी सहकार्यांसह या मार्गावरील 60 वर्षे जुने वडाचे 2 झाड न तोडता ते दुसरीकडे रिप्लांट करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
सयाजी शिंदे यांच्या भूमिकेमुळे या रस्त्यावरील दोन जुने वृक्ष वाचले आहेत.
याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये रस्त्यांच्या कामासाठी वृक्ष तोडले जात आहेत त्यांचे पुनर्स्थापना करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
शिवाय एबीपी माझाने या वृक्षतोडीबाबत आवाज उठवला आणि शासकीय यंत्रणेला सोबत घेऊन हे झाडं वाचवण्यात मदत केली.
त्यामुळे सयाजी शिंदे यांनी एबीपी माझाचेही आभार मानले आहेत.