Pandharpur: पंढरपूर तालुक्यातल्या कासेगावच्या यल्लम्मा देवी यात्रेला सुरुवात, देशभरातून हजारो तृतीयपंथी जोगतिणी दाखल
महाराष्ट्र आणि कर्नाटकसह इतर राज्यातील जग जोगत्यांचे आणि भाविकांचे आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील कासेगावच्या यल्लम्मा देवीच्या यात्रेस आजपासून सुरुवात झाली. image 1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशभरातून हजारो तृतीयपंथी जगजोगतीणी या यात्रेसाठी दाखल झाले आहेत. देशभरातील तृतीयपंथी एक दिवस या यात्रेत एकत्र येत असतात.
महाराष्ट्र , कर्नाटक, आंध्र , गुजरात , मध्यप्रदेश , ओरिसा अशा राज्यातून हे हजारो जोगतीणी काल रात्री कासेगावात दाखल झाले आहेत .
आकर्षक वेशभूषा आणि लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने परिधान केलेल्या या जोगतिणींसाठी ही यात्रा सर्वात मोठा उत्सव असतो.
वर्षभर देशाच्या कानाकोपऱ्यात मागून जीवन जगणारी ही मंडळी या यात्रेच्या निमित्ताने आपल्या अंगावर सर्व प्रकारचे दागिने घालून डोक्यावर देवीचे मुखवटे घेऊन येथे येत असतात .
मानकऱ्यांच्या कमरेला परंपरेप्रमाणे लिंबाचे फाटे गुंडाळून त्यांना वाजत गाजत मंदिरात आणण्यात आले. आज या यात्रेसाठी आलेल्या भाविकांनी देखील आपली नवसपूर्ती साठी लिंब बांधून देवीचे दर्शन घेतले.
कासेगाव येथील या यात्रेला 100 वर्षांपूर्वीपासूनची परंपरा असून प्रामुख्यानं तृतीयपंथीयांनी यात्रा म्हणून या यात्रेची ओळख आहे.
यल्लमा देवीची कर्नाटकमधील सौदंती, कोकटनूर, जत याठिकाणी देवस्थाने आहेत.
वर्षभर मागून जगणारा हा समाज या यात्रेसाठी मात्र देशभरातून ३ दिवस एकत्र येत असतो
यात्रेचा मुख्य दिवस असल्याने दुपारी गावाचे मानकरी वसंत नाना देशमुख यांच्या वाड्यातून सवाद्य देवीचा नैवेध यल्लम्मा देवीच्या मंदिरात आणण्यात आला