पंढरपूर ओव्हरपॅक, विठ्ठलाच्या पदस्पर्शासाठी भाविकांना 5-6 तासांची प्रतीक्षा,मुखदर्शनासाठीही भलीमोठी रांग
आज विठूरायाची पंढरी ओव्हरपॅक झाली आहे. सकाळपासून विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांचा विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगा लावत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध मोक्षदा एकादशीनिमित्त पंढरपुरात हजारो भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.
सकाळपासून विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा नदी प्रदक्षिणामार्ग, महाद्वार, पश्चिमद्वारसह दर्शन रांग ही भाविकांच्या गर्दीने गजबजुन गेली आहे .
आज विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी किमान 5 ते 6 तासांचा कालावधी लागत असून मुखदर्शनासाठी 1 तासाचा कालावधी लागत आहे .
मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध एकादशीनिमित्त वारकऱ्यांनी पंढरीच्या वाटेवर हरीनामाचा गजर केला
टाळ, मृदंगाच्या गजरात विठूरायाच्या नामानं सावळी पंढरी गजबजून गेली आहे..
चंद्रभागेच्या तीरीही भाविकांची तुफान गर्दी उसळली होती. दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या असून विटेवरी उभारलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक तासनतास रांगेत थांबलेत.