Buldhana: तापमानवाढीने ऑक्सिजन सिलेंडरचा भीषण स्फोट, 40 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी, मलकापुरात खळबळ

घटनास्थळी जवळपास 70 ते 80 ऑक्सीजन सिलेंडर भरलेले होते.

Malkapur Accident

1/7
बुलढाण्यातील मलकापूर शहरात आज दुपारी लक्ष्मी नगर भागातील शिवराज फायर सर्व्हिसेस या एजन्सीत ऑक्सिजन सिलेंडरचा भीषण स्फोट झाला.
2/7
बुलढाण्यातील मलकापूर शहरात आज दुपारी लक्ष्मी नगर भागातील शिवराज फायर सर्व्हिसेस या एजन्सीत ऑक्सिजन सिलेंडरचा भीषण स्फोट झाला.
3/7
तापमानवाढीमुळे हा भीषण स्फोट झाला असून प्राथमिक माहितीनुसार, उष्णतेच्या तीव्रतेमुळे सिलेंडरचा स्फोट झाल्याची शक्यता आहे.
4/7
सिलेंडरचा स्फोट झाला त्यावेळी घटनास्थळी जवळपास 70 ते 80 ऑक्सीजन सिलेंडर भरलेले होते
5/7
मात्र, वेळीच झालेल्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला. तरीही चाळीस वर्षीय एका व्यक्ती या स्फोटात जागीच मृत झाला. तर एकजण गंभीर जखमी आहे.
6/7
गंभीर जखमी व्यक्तीवर मलकापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दल दाखल झाले असून, अधिक तपास सुरू आहे.
7/7
या दुर्घटनेमुळे मलकापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. तापमान वाढीमुळे अशा प्रकारच्या घटना घडू शकतात, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
Sponsored Links by Taboola