तब्बल 16 तासांच्या शोधकार्यानंतर नाशिकच्या रामकुंडातून गोदापात्रात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला, ओळख पटली
Nashik Ramkund: मंगळवारी रात्री गोदावरी नदीच्या पात्रात सध्या तब्बल 1 हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरू असताना हा तरुण रामकुंडात पाय घसरून पडला. तब्बल 16 तासांनंतर तरुणाचा मृतदेह सापडला आहे.
Nashik News
1/7
रामकुंडात पाय घसरून गोदावरी नदीत वाहून गेलेल्या बीड जिल्ह्यातील तरुण भाविकाचा मृतदेह अखेर सापडला आहे.
2/7
तब्बल 16 तासांच्या सलग शोध मोहिमेनंतर अग्निशमन विभागाच्या जवानांना केवडीबन भागात मृतदेह आढळून आला.
3/7
मृत भाविकाची ओळख बालाजी मुळे (वय 27), रा. अंबाजोगाई, जिल्हा बीड अशी झाली असून, तो धार्मिक विधीसाठी नाशिकच्या रामकुंडावर आला होता.
4/7
मात्र, काल (सोमवार) सायंकाळी त्याचा पाय घसरून तो थेट गोदावरी नदी पात्रात पडला आणि प्रवाहात वाहून गेला. या घटनेनंतर अग्निशमन विभाग आणि जीव रक्षकांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली होती. रात्रभरचा शोध फोल गेला, मात्र आज सकाळी पानवेलींच्या जाळ्यात अडकलेला मृतदेह आढळून आला.
5/7
सध्या गोदावरी नदीपात्रात सुमारे 1000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असून, त्यात वाहून आलेल्या घनदाट पानवेलींमुळे शोधकार्यात अडथळे निर्माण होत होते.
6/7
बालाजी मुळे याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला आहे.
7/7
बीड जिल्ह्यातून धार्मिक विधीसाठी आलेल्या बालाजी मुळे याचा गोदावरी नदी पात्रातून मृतदेह 16 तासांच्या शोध कार्यानंतर अग्निशमन विभागाच्या जवानांना मिळाला...
Published at : 30 Apr 2025 05:43 PM (IST)