Nashik Unseasonal Rain : नाशिकला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपले, तीन दिवसांनंतरही गारा जशाच्या तशा
नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अवकाळी पावसाने कहर केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या चार दिवसांपासून नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे.
जिल्ह्यातील देवळा, चांदवड, सिन्नर, बागलाण, पेठ आदी तालुक्यात प्रचंड प्रमाणात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली.
अभेटी गावात सोमवारी (10 एप्रिल) सायंकाळी तासभर झालेल्या अवकाळी पावसाने गावातील घरांचे अतोनात नुकसान केले आहे.
अवकाळी पावसाबरोबर गारपीट प्रचंड झाली. गारांचे गोळेच्या गोळे घरांवर कोसळत होते.
म्हणजे पूर्वी गारा पडत होत्या तर हातात घेतल्या घेतल्या विरघळून जायच्या पण सोमवारी झालेल्या गारांच्या पावसातील गारा आजही गोळेच्या गोळे आहेत.
यावेळी गावातील शेतकऱ्यांनी तासभर झालेल्या गारपिटीचे मागील दहा वर्षात अशी गारपीट झाली नसल्याचे सांगितले.
विशेष म्हणजे सोमवारी झालेल्या गारांचा पाऊस आजही जशाच्या तशाच आहे.