Nashik Fire: नाशिकमधील इगतपुरीमधील जिंदाल कंपनीला आग, पाहा फोटो

Nashik Fire: इगतपुरी येथील जिंदाल कंपनीला भीषण आग लागली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Nashik Fire: नाशिकमधील इगतपुरीमधील जिंदाल कंपनीला आग

1/10
नाशिकमधील इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव जवळील जिंदाल कंपनीमध्ये मोठी आग लागली आहे.
2/10
आगीत कंपनीतील काही कामगार, कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे.
3/10
आगी नेमकी कशी लागली, याचे नेमकं कारण समोर आले नाही.
4/10
कंपनीत केमिकल असल्याने स्फोट होत आहेत. आग लागल्यानंतर स्फोटाचे आवाज ऐकू लागले.
5/10
आग लागलेल्या काही कंपनीत काही कामगार अडकले असल्याची माहिती आहे.
6/10
आग प्रचंड मोठी असून महामार्गावरूनदेखील धूराचे लोट दिसत आहे.
7/10
आजूबाजूच्या कारखान्यांना कोणतेही नुकसान झाले नाही.
8/10
आगीची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
9/10
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि कामगारांची सुटका करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
10/10
आगीची माहिती समजताच नाशिकचे पालक मंत्री दादा भुसे यांनी आपला औरंगाबाद दौरा रद्द केला.
Sponsored Links by Taboola