PHOTO: सातपुड्याच्या दुर्गम भागातील हजारो नागरिकांना मदतीचा हात, नंदुरबार जिल्हा प्रशासनाचा उपक्रम
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वताच्या दर्या- खोर्यातील दुर्गम अशा 64 गावामध्ये राहणार्या 52 हजार 595 नागरिकांना नंदुरबार जिल्हा प्रशासनाने स्तुत्य उपक्रम राबवला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहसूल आणि अन्न पुरवठा विभागाच्या माध्यमातून 5 हजार 520 एवढा क्विंटल गहू, 16 हजार 109 क्विंटल तांदूळ आगामी चार महिन्यांसाठी पोहोचविण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी मनीषा खत्री (Collector Manisha Khatri) यांच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी बजावण्यात आली.
नंदुरबार जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग म्हणजे तापी नदी ओलांडली की सुरू होतात त्या पूर्व- पश्चिम पसरलेल्या सातपुडा पर्वताच्या रांगा.
या डोंगर रांगेतील दर्या- खोर्यात आदिवासी बांधव नर्मदा नदीच्या काठावर वर्षानुवर्षे वास्तव्य करून आहेत.
त्यापैकी अनेकांचा उदरनिर्वाह हा वनोपजांवर आणि हंगामी शेतीवर अवलंबून.
त्यामुळे येथील नागरिकांना पावसाळ्यात अन्न उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
पावसाळा सुरू होत असल्याने नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागामध्ये नवसंजीवनी योजनेंतर्गत अक्राणी व अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आणि पावसाळ्यात जवळपास 64 गावांमधील संपर्क तुटतो.
या गावातील नागरिकांना चार महिने पुरेल इतका अन्नधान्याचा पुरवठा व जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात प्रशासनाच्या वतीने पोहचविण्यात आला आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरात या तीन राज्यांच्या सीमेलगत नर्मदा नदीच्या काठावरील उडद्या, बादल, भामाणे, सावर्यादिगर, भाबरी, मणिबेली, धनखेडी, चिमलखेडी, बामणी, मुखडी, डनेल हा भाग अतिदुर्गम असल्यामुळे या भागात पावसाळ्यात वाहने जात नाही.
पावसाळ्याच्या परिस्थितीत येथील नागरिकांची गैरसोय होवू नये म्हणून राज्य शासनाच्या वतीने प्रशासनाने त्यांना पावसाळ्याचे चार महिने (जून ते सप्टेंबर) पुरेल एवढे अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला आहे.