मुंबई ते मराठवाडा... जिकडे तिकडे पाणीच पाणी, धबधबा वाहिला तर कुठं अख्खं पीक पाण्यात, जीवघेणी कसरत

राज्यभरात अनेक भागात जोरदार पाऊस झाल्याने नद्या नाले ओसंडून वाहू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे, शेती पिकांचे व फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे

Continues below advertisement

Mumbai rain update traffic school

Continues below advertisement
1/18
राज्यभरात अनेक भागात जोरदार पाऊस झाल्याने नद्या नाले ओसंडून वाहू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे, शेती पिकांचे व फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे
2/18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीपासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. गडनदीने ईशारा पातळी ओलांडली असून नदीचे पाणी कणकवली मालवण राज्य मार्गावर आल्याने काही काळ वाहतूक अन्य मार्गाने वळविली होती.
3/18
जाणवली आणि गडनदीच्या संगमाचे विहंगम दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिपलं असून पाण्याने ओढलेलं गाव दिसत असून निसर्ग सौंदर्याचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
4/18
रिसोड तालुक्यातील नेतन्सा गावातील नमहादेव संस्थान इथं दर्शनासाठी गेलेल्या 8 युवकांना कांचनदीला आलेल्या पुराच्या पाण्याने अवघ्या काही मिनिटात वेढा दिल्याने.
5/18
आठही युवक मंदिर परिसरात अडकून पडले असून त्यांच्या सुटकेसाठी स्थानिक व प्रशासनाकडून मदत केली. तब्बल पाच तासांनी थरारकपणे या युवकांची सुटका करण्यात आलीय
Continues below advertisement
6/18
खेड तालुक्यातील आवशी गावात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असून गावातील अनेक वाड्यांचा संपर्क तुटला आहे.
7/18
मुंबई–गोवा महामार्गावरील चुकीच्या कामामुळे पाणी थेट गावात शिरल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. लोटे एमआयडीसी परिसरातील काही रासायनिक कंपन्यांच्या संरक्षण भिंतींमुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह थांबला असून त्यामुळे आवशी गावात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे.
8/18
परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील गौंडगाव परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे येथील सिद्धेश्वर जाधव यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या शेताला चक्क तळ्याचे स्वरूप आले.
9/18
शेतकऱ्यांचा कापूस पाण्याखाली गेला आहे, पूर्ण शेतात कमरे एवढे पाणी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांनी सरकार दरबारी मदत देण्याची मागणी केली आहे.
10/18
16 व 17 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या मुसळधार पाऊस व विजेच्या तडाख्यामुळे जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये शेतपिकांचे, घरांचे, जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले आहे.
11/18
कल्याण मध्ये मुसळधार पाऊस झाल्याने कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात पाणी साचले असून रेल्वे पोलिसांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे
12/18
जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या अजिंठा लेणी परिसरात असलेल्या सप्तकुंड धबधब्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने तोही वाहू लागल्याने,पर्यटकांच्या दृष्टीने पर्वणी ठरला आहे
13/18
पावसाने सगळीकडे हाहाकार उडाला असून कुठे कारमधून, कुठे बोटीतून, कुठे दोरीच्या सहाय्याने पाण्यात अडकेल्यांची सुटका केली जात आहे
14/18
रस्त्यांना नद्याचे स्वरुप प्राप्त झाल्याने चक्क गुडघाभर पाणी रस्त्यावर साचले असून या पाण्यातून चारचाकी वाहनेही मार्गस्थ होत आहेत.
15/18
रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून आपल्या मुलाला सुखरुप घरी नेण्यासाठी दुचाकीवरुन मार्ग काढताना बापमाणूस ह्या फोटोत दिसत आहे
16/18
रस्त्यासह शहरातील पुलाखाली, उड्डाणपुलावरही पाणी साचल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता.
17/18
रायगड जिल्ह्यातील कोलाड खांब परीसर रुग्णवाहिकेला देखील पाण्यातून कसरत करावी लागत आहे.
18/18
मुंबईतील सायन किंग्ज सर्कल येथे पाण्यात अडकलेल्या शाळेच्या बसमधून मुलांची मुंबई पोलिसांनी सुटका केली. घाबरलेली मुले नंतर पोलीस काकांना अशी बिलगली जशी वडिलांच्या कुशीत विसावतात.
Sponsored Links by Taboola