Photos: गणेशोत्सवाचा मुहूर्त साधला; महामंडळाच्या ताफ्यात नवी लाल परी; अफलातून सफारी
एसटी महामंडळाच्या बसबाबत प्रवाशांची नेहमीच ओरड असते, बस गाड्यांची झालेली दूरवस्था अनेकदा अपघाताचे कारण ठरते. मात्र, एसटी प्रवाशांसाठी आता गुडन्यूज आहे. कारण, महामंडळाच्या ताफ्यात नव्या बस आल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसर्वसामान्यांचा प्रवास सुखकर करणाऱ्या लालपरीच्या ताफ्यात आता लवकरच आणखी नवीन बसेस येणार आहेत. राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांना वेळेत बस उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नवीन बस खरेदीबरोबरच भाडेतत्वावर गाड्या घेण्यावर भर देत आहेत
या धोरणानुसार लवकरच 5 हजारहून अधिक गाड्या एसटीच्या ताफ्यात येत आहेत. त्यापैकी 1310 गाड्या भाडेतत्त्वावर घेण्यासाठी आता निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे, लवकरच या बसेस रस्त्यावर धावणार असल्याचं दिसून येतं.
मुंबई, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर या शहरांत लालपरी आता नव्या रूपात अवतरणार असल्याचे समजते. सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या 14 हजार बस आहेत. मात्र, या बसेसची दूरवस्था झाल्याने प्रवासी संताप व्यक्त करतात
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने अधिकृत ट्विटर हँडलवरुन नव्या कोऱ्या बसचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तीन बस दिसत असून प्रवाशांना लवकरच अफलातून बसची सवारी करता येईल.
नव्या लाल परीचा लूक एकदम झक्कास दिसून येतोय, तसेच बैठकव्यवस्था आणि स्टायलिश लूक आहे. त्यामुळे, प्रवाशांच्या पसंतीस ही लालपरी पडणार आहे
दरम्यान, रोड टेस्टसाठी या बस अवतरल्या असून रोड टेस्ट झाल्यानंतर लवकरच या बस प्रवाशांच्या सेवेत हजर होणार आहेत.