Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
9 ते 16 जून दरम्यान महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार
यावर्षी देशात चांगला पाऊस (Rain) पडण्याचा अंदाज हवामान विभागानं (IMD) वर्तवलाय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहवामान अभ्यासक पंजाबराव डख (PunjabRao Dakh) यांनी महाराष्ट्रात यावर्षी कधी पाऊस येईल? यावर्षीचा पावसाळा कसा असेल? याबाबतची माहिती सांगितली आहे.
सध्या अंदमान निकोबारमध्ये मान्सूनची एन्ट्री झाली आहे. 31 मे पर्यंत हा मान्सून केरळमध्ये दाखल होईल अशी माहिती पंजाबराव डखांनी दिलीय.
यावर्षी केरळमधील मान्सूनचे आगमन हे तारखेपूर्वीच म्हणजेच एक जून अगोदरच होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
28 मे ते 3 जून दरम्यान कधीही मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार 9 ते 16 जूनच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे आगमन होईल.
28 मे ते 3 जून दरम्यान कधीही मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार 9 ते 16 जूनच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे आगमन होईल.
गेल्या वर्षी आपल्याला माहित आहे की एल निनो सक्रिय झालेला होता. त्यामुळं संपूर्ण भारतामध्ये खूप कमी प्रमाणात पाऊस झाला होता.
संपूर्ण भारतामध्ये खूप कमी प्रमाणात पाऊस झाला होता. परंतू, यावर्षी एल निनोची स्थिती या आठवड्यामध्ये संपुष्टात आली आहे.
येणाऱ्या तीन ते पाच आठवड्यामध्ये ला नीनाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये यावर्षी चांगला पाऊस अपेक्षित आहे.