Aadhar आधार केंद्र चालकांसाठी गुडन्यूज; मानधनात वाढ, नवीन आधार कीटही दिले

Aadhar राज्यातील आधार केंद्र चालकांना अद्ययावत आधार संच मिळावे अशी मागील काही वर्षांपासून राज्यातील आधार केंद्रांची मागणी होती. त्यानुसार, आता पुरवठा केला जात आहे.

Continues below advertisement

Mumbai aadhar center increase

Continues below advertisement
1/7
राज्यातील आधार केंद्र चालकांना अद्ययावत आधार संच मिळावे अशी मागील काही वर्षांपासून राज्यातील आधार केंद्रांची मागणी होती. त्यानुसार, आता पुरवठा केला जात आहे.
2/7
आता हे आधार संच माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत वितरीत करीत आहोत. आज मुंबई शहर, मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यातील आधार केंद्र चालकांना बोलावून माहिती व तंत्रज्ञानंत्री आशिष शेलार यांच्याहस्ते आधार संच सुपूर्त करण्यात आले.
3/7
डिजिटल सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. यावेळी माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक अनिल भंडारी, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
4/7
विशेष म्हणजे आधार केंद्र चालकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णयही यावेळी मंत्री शेलार यांनी जाहीर केला. त्यामुळे, आधार केंद्र चालकांना आता एका नोंदणीमागे 30 रुपये अधिक मिळणार आहेत.
5/7
आधार केंद्र चालकांना एका नोंदणीसाठी मानधन 20 रुपयांवरून 50 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे. यापूर्वी, एका नोंदणीला 20 रुपये मिळत होते.
Continues below advertisement
6/7
दरम्यान, नवीन अद्ययावत आधार संच उपलब्ध झाले असून मुंबई आणि मुंबई शहरातील सुमारे 100 आधार केंद्र चालकांना संच सुपूर्त करण्यात आले.
7/7
राज्यातील 12 कोटी 80 लाख आधार कार्ड नोंदणी पूर्ण झाली असून ज्यात ० ते ५ वयोगटातील नोंदणी 39 टक्के पूर्ण आहे.
Sponsored Links by Taboola