राज ठाकरेंच्या मुलाखतीमधील दहा महत्त्वाचे मुद्दे
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पनवेलमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं होतं.
Raj Thackeray
1/9
बाळासाहेब ठाकरे यांची फोटो बायोग्राफी करणे माझ्या वडीलांमुळं शक्य झाल्याचे राज ठाकरे म्हणाले. कारण त्यांनी सुरुवातीच्या काळात बाळासाहेबांचे फोटो काढले होते.
2/9
मी झेपेल तेवढेच वाचतो. मला एखादी गोष्ट आवडली तर मी परत परत वाचतो.
3/9
महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवरही राज ठाकरेंनी भाष्य केलं. आत्ताची महाराष्ट्रातली राजकीय स्थिती पाहाता मतदारांना काही किंमत आहे असं मला काही वाटतच नाही.
4/9
छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले ही महाराजांची स्मारके असल्याचे राज ठाकरे म्हणाले. किती पुतळे बांधणार, काय त्यांची अवस्था आहे. इंदू मिलच्या ठिकाणी जगातील सर्वात मोठे ग्रंथालय उभारायला हवं होतं अशी माझी इच्छा होती.
5/9
मला ठराविक लोकांची चरित्र वाचायला आवडतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी, सावरकर यांचे जीवन चरित्र वाचायला आवडेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र वाचायला आवडेत.
6/9
राज ठाकरेंनी वाचलं पाहिजे असा प्रश्न जे विचारतात हा विचारांच्या अज्ञानाचा भाग असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
7/9
मी सामना आणि मार्मिक वाचत नाही. सामना घरी येतो.
8/9
परदेशात किती चांगले ग्रंथालय उभी केली आहे. आपल्याकडे का तसे होत नाही. परदेशातील बुक शॅापमध्ये बसून वाचायला मिळते.
9/9
भाषा ही तुमची ओळख आहे. मराठी भाषा बोलणारा व्यक्ती आहे ही तुमची ओळख असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
Published at : 27 Feb 2023 03:23 PM (IST)