Maratha Reservation : मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही, संभाजीराजेंचा निर्धार
खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhijiraje Chhtrapati) हे कालपासून आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. आझाद मैदानावर मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhijiraje Chhtrapati) हे आमरण उपोषणाला बसले आहेत.
संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासाठी अनेक ठिकाणाहून मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. त्या कार्यकर्त्यांनी आझाद मैदानातच पहिल्या रात्रीचा मुक्काम केला.
मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही, असा निर्धार संभाजीराजेंनी केला आहे.
आम आदमी पक्षाचे संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भर पडली आहे. त्यांनी संभाजीराजे यांना पाठिंब्याचे पत्र देत या उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे.
भाजपचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आझाद मैदानावर येऊन आंदोलनाला पाठिंबा दिला.