Manoj Jarange : जरांगेंचा मोर्चा पुण्यात दाखल; आज मुंबई आंदोलनाचा पाचवा दिवस!
मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण यात्रेचा आज पाचवा दिवस आहे. (Photo Credit : Pune Reporter)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appही आरक्षण यात्रा आज खराडी बायपासवरुन निघून तळेगावमार्गे लोणावळा या ठिकाणी पोहोचणार आहे आणि याच ठिकाणी मनोज जरांगे यांचा मुक्काम असणार आहे. (Photo Credit : Pune Reporter)
दरम्यान अवघ्या दोन दिवसात जरांगे मुंबईत पोहोचणार असून सरकार हे आंदोलन कसे हाताळणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष असेल. (Photo Credit : Pune Reporter)
राज्य सरकारकडून अद्याप कोणतेही ठोस निर्णय आला नसल्याने आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय. (Photo Credit : Pune Reporter)
सरकारचा तीन कलमी प्रस्ताव मनोज जरांगे पाटलांनी फेटाळला आहे. छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड आणि जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी जरांगे यांची भेट घेतली. (Photo Credit : Pune Reporter)
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकहून मराठा आंदोलक पुण्याच्या दिशेने निघत आहेत. (Photo Credit : Pune Reporter)
आंदोलनात सहभागी होणाऱ्या मराठा आंदोलकांना नाशिकहुन रसद पुरवठा केला जाणार आहे. (Photo Credit : Pune Reporter)
मुंबईतील मराठा आंदोलनाविरोधातील याचिकेवर आज हायकोर्टात तातडीची सुनावणी होणार आहे. मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. (Photo Credit : Pune Reporter)
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारण्याची मागणी तसेच जरांगे आणि त्यांच्या समर्थकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली होती. (Photo Credit : Pune Reporter)
बाहेर कडाक्याची थंडी रस्त्यावर लोकांच्या दुतर्फा रांगा, थंडीतून सुटका मिळावी म्हणून लोकांनी शेकोट्या पेटवलेल्या आणि शेकोट्या पेटवून लोकं जरांगेची वाट पाहत असल्याचे चित्र रात्री पाहायला मिळाले. (Photo Credit : Pune Reporter)