Manoj Jarange Maratha Reservation : लाखोंचा जनसागर अन् एकच जल्लोष; मुख्यमंत्र्यांच्या हातानं ज्यूस घेऊन अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं!
मनोज जरांगेंनी उभा केलेल्या मराठ्यांच्या लढ्याला यश आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनोज जरांगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडलं आहे.
नवी मुंबईत मराठ्यांचा जनसागर उसळला आहे.
अखेर मनोज जरांगे आणि मराठा समाजाच्या आंदोलनाला यश मिळालं आहे. मुख्यमंत्र्यांनी आणि मनोज जरांगे पाटलांनी आधी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन आणि एकमेकांना पेठे भरुन आनंद साजरा केला.
मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटलांची गळाभेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी मंचावरच मुख्यमंत्री आणि मनोज जरांगे पाटलांनी विजयी गुलाल उधळला.
मराठा बांधवांनी मनोज जरांगेंना आणि मुख्यमंत्र्यांना तलवार भेट दिली.
मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगेंचा हातात हात घेऊन विजयी जल्लोष साजरा केला
यावेळी मोठ्याने घोषणाबाजीदेखील करण्यात आली.