Photo : नांदेडमध्ये मकरसंक्रांती निमित्त पतंग उडवण्याची धूम, थोरा- मोठ्यांसह लहानग्यांचीही पतंगबाजीसाठी चढाओढ
Makar Sankranti 2023 : नांदेडमध्ये आज मकरसंक्रांती निमित्त पतंग उडवण्याची धूम पाहायला मिळाली. थोरा- मोठ्यासह लहानग्यांचीही पतंगबाजीसाठी चढाओढ सुरू होती.
Makar Sankranti 2023
1/9
राज्यभरात आज मकरसंक्रातीचा सण मोठ्या उत्सवात साजरा झाला. नांदेडमध्येही पतंग उडवण्याचा आनंद लुटला.
2/9
रंगेबी रंगी पतंग खरेदी करण्यासाठी बच्चे कंपन्यांनी दुकानांमध्ये गर्दी कोली होती.
3/9
दिसभर लहानग्यांनी पतंग उडवण्याचा आनंद लुटला.
4/9
भारतीय ध्वजाच्या रंगाचे नकाशे हवेत सोडून नांदेडकरांनी देशाबद्दलचे प्रेम दाखवून दिले.
5/9
बच्चे कंपनीसोबतच मोठ्या लोकांनी देखील पतंगबाजी केली.
6/9
कोरोना नंतर दोन वर्षांनी आलेल्या संक्रांतीनिमित्त पतंगबाजीसाठी लहान मुलांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
7/9
छोटा भीम, पोकिमॉंन, तिरंगा असणारा, मिकी माऊस असणारे असे विविध रंगी पतंग बाजारपेठेत आल्याने बाजारपेठा रंगीबेरंगी पतंगांनी फुलून निघाल्या आहेत.
8/9
इमारतींच्या गच्चीवर एकत्र येत लहानग्यांनी पतंग उडवण्याचा आनंद लुटला.
9/9
संपूर्ण नांदेडकर या उत्सवात सहभागी झाले होते.
Published at : 15 Jan 2023 09:07 PM (IST)