राजकीय नेते - बॉलीवूड सेलिब्रेटी सगळ्या दिग्ग्जांची हजेरी; पाहा कोण कोण पोहचलं शपथविधी कार्यक्रमाला!
महायुती सरकारचा शपथविधी (Mahayuti Oath Ceremony) सोहळा आज मुंबईच्या आझाद मैदानावर (Azad Maidan) पार पडणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्रीपद तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर मह्युतीकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सोहळ्याला देशभरातून राजकीय नेते, बॉलीवूड सेलिब्रेटी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत.
आता मान्यवर आझाद मैदानावर दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
भाजपकडून महायुती सरकारच्या शपथविधीसाठी महत्त्वाच्या नेत्यांना शपथविधीचे आमंत्रण देण्यात आले आहे. देशातील बड्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना व प्रमुख नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
भाजपशासित राज्यांसह मित्रपक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रण देण्यात आले आहे. निमंत्रितांमध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्रप्रदेश, हरियाणा अशा महत्त्वाच्या राज्यांचा समावेश आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हिम्मंता बिस्वा, गुजरात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, बिहारचे मुख्यमंत्री नितेश कुमार, अरुणाचल सीएम पेमा खंडू, उत्तराखंड मुख्यमंत्री पुष्कर धामी यांच्यासह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या सोहळ्यासाठी मुंबईत दाखल होत आहेत.
सलमान खान, शाहरुख खान, सचिन तेंडूलकर हे देखील आझाद मैदानात पोहचले आहेत.
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार मंचावर दाखल, काही क्षणांत होणार शपथविधीला सुरवात होणार.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही फडणवीस यांच्या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित
केंद्रीय मंत्रिमंडळाती अनेक बडे नेते शपथविधीसाठी उपस्थित
देवंद्र फडणवीस यांच्या शपथविधीसाठी अभिनेता रणवीर सिंह पोहोचला (all photo: ANI)