Mahashivratri 2024 : जेजुरीत तीन गुप्तलिंग अखेर दर्शनासाठी खुले! वर्षातून एकदाच होते दर्शन, यामागील धारणा जाणून घ्या
Mahashivratri 2024 : महाराष्ट्राच कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या गडावर म्हणजेच जेजुरी गडावर महाशिवरात्री साजरी करण्यात येत आहे. या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या मंदिरात असणारी तीन गुप्तलिंग वर्षातुन फक्त एकदाच दर्शनासाठी खुले केले जातात..
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाशिवरात्रीनिमित्त आज सकाळपासून गुप्तलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलीये. खंडेरायाच्या मंदिराच्या गाभाऱ्यात तसेच शिखरामध्ये ही गुप्तलिंग आहे. गुप्तलिंग वर्षात फक्त एकच दिवस उघडले जाते.
भुलोक, पाताळलोक, स्वर्गलोक अशा तिनही लोकांची एकाच दिवशी महाशिवरात्रीला दर्शन होत असल्याची श्रद्धा भाविकांची आहे..
महाशिवरात्रीला गडावर लाखो भाविक गुप्तलिंगाच्या आणि खंडेरायाच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात.. मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे.
माघ कृष्ण चतुर्दशी म्हणजे महाशिवरात्री, या दिवशी जेजुरी गडावरील मुख्य मंदिरातील तळघरातील खंडोबाचे गुप्तलिंग दर्शनासाठी उघडले जाते. मंदिराचे कळसामधील लिंग हे दर्शनासाठी उघडले जाते,
संपूर्ण वर्षात केवळ महाशिवरात्र आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच या लिंगाचे दर्शन मिळत असल्याने असंख्या भाविक या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करतात.