Maharashtra Weather Update: प्रचंड धग वाढली, पुण्यासह 10 जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट, अकोला 45 अंशांच्या पुढे, पुढील 4 दिवस...
राज्यात पुढील चार दिवस महत्त्वाचे राहणार असून उष्णतेच्या चटक्यासह अवकाळी पावसाचे अलर्टही देण्यात आले आहेत. आज मे महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या जिल्ह्याचं तापमान किती? तपासा
Maharashtra Weather Update
1/8
राज्यात तापमानाचा पारा असह्य झाला आहे .मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आलाय .
2/8
मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात आज प्रचंड उष्ण व दमट हवामान आहे . हवामान विभागाने 10 जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट दिलाय .
3/8
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, अहिल्यानगर, पुणे,सातारा, सोलापूर तसेच अकोला या जिल्ह्यांना उष्णतेचा हाय अलर्ट देण्यात आलाय .
4/8
अकोल्यात आज 45 अंश तापमानाची नोंद झाली आहे .एक दोन जिल्हे वगळता विदर्भात तापमान 41 - 45 च्या पुढे आहे .
5/8
विदर्भात वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय .
6/8
पुण्यात आज 39.7°c तापमान आहे .सातारा 40.7,सोलापूर 43.6,नंदुरबार 43.4,जळगाव 43.5 अंशावर गेलं आहे.
7/8
छत्रपती संभाजी नगर मध्ये 42.4 अंश सेल्सिअस परभणीत 43.7,नांदेड 42.4 लातूर 41.2 धाराशिव 42 अंशावर आहे.
8/8
पुढील चार दिवस उत्तर महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय.विदर्भातही पाऊस कायम राहणार आहे.
Published at : 01 May 2025 02:59 PM (IST)