थंडीचा कडाका वाढला! मराठवाडा विदर्भात हाडं गोठवणारी थंडी, जळगाव 10 अंशांच्या खाली गेलं, कुठे काय स्थिती?

पुढील काही दिवसांत तापमानात आणखी घट होऊन थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

Temperature Today

Continues below advertisement
1/7
राज्यातील बहुतांश ठिकाणी आता हवेत चांगलाच गारठा जाणवू लागला आहे.
2/7
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील तापमान झपाट्याने घसरत आहे.
3/7
अनेक जिल्ह्यांमध्ये 10 अंशांच्या खाली तापमान गेल्या असून आज जळगावात हाडं गोठवणारी थंडी आहे. हवामान खात्याने 9.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली. 6.2 अंशांनी तापमान घसरले आहे.
4/7
राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा 9 ते 15 अंशांच्या मध्ये आहे.
5/7
विदर्भ मराठवाड्यात थंडी वाढली असून संध्याकाळनंतर तापमान वेगाने घसरत आहे. छत्रपती संभाजीनगरसह आज नांदेड, परभणी जिल्ह्यात 13 अंश सेल्सिअस तापमान आहे.
Continues below advertisement
6/7
विदर्भात अकोला अमरावती नागपूर जिल्ह्यांमध्ये 12 अंश सेल्सिअस वर किमान तापमानाचा पारा गेलाय. उर्वरित ठिकाणी बारा ते चौदा अंश सेल्सिअसपर्यंत तापमान आहे.
7/7
हवामान खात्याने पुढील पाच दिवसांसाठी महाराष्ट्रात कोरडे वातावरण राहणार असून किमान तापमानात फारसा फरक होणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे नागरिकांना आता चांगलीच थंडी जाणवण्याची शक्यता आहे.
Sponsored Links by Taboola