Maharashtra Weather Update:तापमानाचा कहर! दोन दिवसांनी विदर्भात पावसाचा यलो अलर्ट, तुमच्या शहरात काय अंदाज? पहा Photos

राज्यात कमाल व किमान तापमानात फारसा बदल होणार नसला तरी काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.

Weather Update

1/7
राज्यात तापमानाचा चटका चांगलाच वाढलाय .संपूर्ण राज्यात सामान्य होऊन अधिक तापमानाची नोंद होत आहे .
2/7
शनिवारी विदर्भात सर्वाधिक तापमानाच्या नोंदी झाल्या .आजही बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा सर्वाधिक होता .
3/7
गेल्या चार दिवसांपासून सोलापुरात 40 डिग्री सेल्सिअस तापमान आहे .विदर्भात बहुतांश भागात कमाल तापमानाने चाळीशी ओलांडली आहे . ( या नकाशात आजचे (16 मार्च) तापमान पाहता येईल)
4/7
राज्यात किमान तापमान ही सामान्य तापमानाहून अधिक नोंदवण्यात आले .त्यामुळे नागरिकांना असेही उन्हाचा चटका आणि उष्णतेने हैराण केले आहे .
5/7
हवामान विभागाने आज अकोला अमरावती वर्धा नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा अलर्ट दिला होता .वर्धा आणि चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट व इतर ठिकाणी येल्लो अलर्ट होता .
6/7
तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह सोलापुरात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली होती .
7/7
त्यामुळे एकीकडे प्रचंड तापमान सहन करावे लागणार आहे तर काही जिल्ह्यांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे .
Sponsored Links by Taboola