Maharashtra Temperature today: महाराष्ट्र तापला! अकोल्यात 44.1°, पुण्यात 41.2 अंश, तुमच्या शहरात पारा किती? Photos
राज्यात आज तापमानाचा भडका उडालाय. संपूर्ण महाराष्ट्रात कमाल तापमानाचा उच्चांक नोंदवला जात आहे. तुमच्या शहरात किती पारा नोंदवण्यात आलाय? चेक करा
Temperature Todat Maharashtra
1/8
राज्यातील नागरिक सध्या उन्हाच्या चटक्याने त्रासले आहेत .प्रचंड उन्हाच्या झळा आणि उकाडा वाढला आहे .
2/8
आज संपूर्ण महाराष्ट्रात कमाल तापमान अतिउच्च नोंदवले जात असून IMD ने आज अकोल्यात सर्वाधिक 44.1 अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदवले .
3/8
आज मध्य महाराष्ट्र विदर्भासह मराठवाडाही चांगलाच तापलाय . राज्यात उष्णतेने धग वाढली आहे .
4/8
अमरावती यवतमाळ चंद्रपूर बीड सोलापूर जळगाव या जिल्ह्यांमध्ये 42 अंशांहून अधिक तापमानाची नोंद आज झाली .
5/8
पुण्यात आज 41.2 अंश सेल्सिअस तापमान आहे .अहिल्यानगर सातारा सांगली धाराशिव लातूर वर्धा नागपूर या जिल्ह्यांमध्ये 40° ने अधिक तापमान नोंदवले गेले .
6/8
मुंबई, ठाणे, पालघर व कोकणपट्ट्यात उष्ण व दमट हवामानाची नोंद होत आहे .
7/8
मध्य महाराष्ट्र मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट तापमानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे .
8/8
तर विदर्भात गडचिरोली चंद्रपूर वर्धा यवतमाळ या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा आहे .
Published at : 17 Apr 2025 02:07 PM (IST)