उष्ण व कोरड्या वाऱ्यांनी प्रचंड रखरख वाढली, पुण्यासह 8 जिल्ह्यांना हायअलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?
Maharashtra Temperature Update: राज्यात येत्या दोन ते तीन दिवसात मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्ण व दमट हवामानाचे अलर्ट देण्यात आले आहेत.
Maharashtra Temperature Update
1/9
देशभरात प्रचंड तापमान वाढलंय . कोरड्या व उष्ण झळांनी रखरख वाढली असून तापमानाच्या उच्चांकाने नागरिकांची बेजारी होतेय .
2/9
विदर्भात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचे राहणार असल्याचं हवामान विभागानं वर्तवलय .बहुतांश जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय .
3/9
पावसाचा अलर्ट असला तरी तापमान मात्र जैसे थे च असल्याचे चित्र आहे .बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 42 ते 44 अंशांपर्यंत आहे .
4/9
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी 42 अंशांच्या वर तापमान गेलंय . आज 42.6° एवढं तापमान आहे .
5/9
परभणी ते 43.4 बीड 42.1 लातूर धाराशिव 41 अंशावर आहे .उत्तर महाराष्ट्रात जळगाव नंदुरबार 43 अंशांच्या पुढे गेलेत .
6/9
मध्य महाराष्ट्र ही सध्या प्रचंड तापला आहे .पुण्यात पुढील दोन दिवस उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलाय .आज 40.2 अंश एवढे तापमान नोंदवले गेले आहे .
7/9
सोलापुरात 42.9 अंश, सांगली 39, कोल्हापूर 37.8, सातारा 40.7 अंश सेल्सिअसवर आहे.
8/9
मुंबई उपनगर तसेच कोकणपट्ट्यात कमाल तापमानाचा पारा सामान्यहून अधिक नोंदवण्यात येतोय.उकाडाही प्रचंड वाढलाय.
9/9
येत्या दोन दिवसात पुण्यासह 8 जिल्ह्यंना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आलाय. जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, सोलापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगरमध्ये उष्णता वाढणार आहे.
Published at : 30 Apr 2025 04:43 PM (IST)