Maharashtra Weather Today: राज्यभरात गारठा वाढला! नगर 8.5 अंशांवर, पुणेकरांनाही हुडहुडी; पुढील 2 दिवसात हवामान बदलणार

राज्यातील अनेक भागात सध्या थंडी (Cold Weather) वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात आठवडाभर कोरडं वातावरण राहणार आहे.

Continues below advertisement

cold weather

Continues below advertisement
1/6
देशासह राज्याततील अनेक भागात तापमानाचा पारा घसरला आहे. राज्यातील अनेक भागात सध्या थंडी (Cold Weather) वाढताना दिसत आहे.
2/6
महाराष्ट्रात आठवडाभर कोरडं वातावरण राहणार आहे. पुढील 2 दिवसांत राज्यात कमाल व किमान तापमानात किंचित वाढ होणार असून त्यानंतर 2 ते 3 अंशांनी तापमान घसरणार आहे.
3/6
राज्यात हळूहळू तापमानाचा पारा घसरत आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमधील किमान तापमान 12 अंशाखाली गेलं आहे. त्यामुळं हुडहुडी वाढली आहे. यवतमाळ जिल्ह्यात आज 9.6 अंश तापमानाची नोंद झाली.तर अकोला, नागपूर 10 अंशांवर होते.
4/6
मराठवाड्यातही बहुतांश ठिकाणी थंडीचा कहर वाढलाय. नांदेडमध्ये आज 8.9 अंश तापमानाची नोंद झाली. तर छत्रपती संभाजीनगर 11 अंशांवर होते. परभणीत पार 10.8 अंशांवर गेलाय.
5/6
मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात जेऊरमध्ये 7 अंश सेल्सियस तापमान होतं. नगर 8.5 अंशांवर गेल्याने नागरिकांना हुडहुडी भरलीय.
Continues below advertisement
6/6
नाशिक 9.8 अंश तर पुणे 10.4 अंशांवर आहे. सातारा, सोलापूर जिल्ह्यात 11 ते 13 अंश तापमान आहे.
Sponsored Links by Taboola