Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Weather : राज्याच्या विविध भागात पावसाचा अंदाज
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजपासून (15 मार्च) राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) शक्यता आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाही ठिकाणी गारपीट देखील होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामानातील बदलामुळं (Climate Change) शेती पिकांना फटका बसत आहे.
सध्या कांदा, गहू, हरभरा या पिकांची काढणी सुरु आहे. अशातच पाऊस आल्यास पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं दिली आहे.
दिवसाच्या कमाल तापमानातही दोन अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शेतकरी बांधवांनी पावसाची शक्यता असल्यानं हरभरा, गहू पक्वता अवस्थेत असलेल्या पिकांची काढणी करुन सुरक्षित ठिकाणी ठेवावीत असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.
गुरुवार दिनांक 16 मार्च ते 18 मार्चपर्यंत तीन दिवस संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह किरकोळ पावसाची शक्यता आहे.
पावसाच्या तीव्रतेची निश्चिती मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात अधिक जाणवत आहे.
मध्य महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
16 आणि 17 मार्चला तीन दिवस विशेषतः गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात पावसाची अधिक शक्यता आहे.
मराठवाड्यातील विशेषतः उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्यता अधिक आहे.