पुढील पाच दिवस राज्यातील काही ढगाळ वातावरण
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकुठे ढगाळ वातावरण जाणवत आहे, तर कुठे उन्हाचा चटका आहे. तर काही भागात सध्या थंडीचा कडाका वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पुढील पाच दिवस राज्यातील काही जिल्ह्यात ढगाळ वातावरणाची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. तर तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
राज्यातील काही भागात पावसाची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड आणि चंद्रपूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवारी 9 पर्यंत ढगाळ वातावरणाची शक्यता अधिक आहे
अगदी तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवत आहे.
विदर्भ मराठवाड्यासहीत उर्वरित महाराष्ट्रात मात्र पहाटेचा गारवा कमी होवून दुपारचे कमाल तापमान काहीसे अधिक राहण्याची शक्यता आहे. तिथे पावसाची शक्यता नसल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
पुढील पाच दिवस राज्यातील काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. या पाच दिवसांच्या कालावधीत अरबी समुद्रात चक्रीय वाऱ्याच्या स्थितीतून कमी दाब क्षेत्राची निर्मिती होऊ शकते.
गेल्या काही दिवसांत मुंबई, कोकणसह राज्यातील तापमानात बदल झाला आहे. सकाळी हवेतील गारवा वाढला आहे.