Maharashtra Weather Update: वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, महाराष्ट्रात ठिकठिकाणी अवकाळी दणका देणार, कुठे यलो अलर्ट?

Weather Update: विदर्भासह मराठवाडा व मध्य व उत्तर महाराष्ट्रात पावसाची हजेरी राहणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय.

IMD

1/8
कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भावर वादळी वाऱ्यासह पावसाचे ढग दाटले आहेत .
2/8
हवामान विभागाच्या अंदाजानुसार लवकरच नैऋत्य मोसमी पाऊस अंदमान समुद्रावर हजेरी लावणार आहे .
3/8
पश्चिमे चक्रावताच्या सक्रियतेमुळे सध्या राज्यभरात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय .
4/8
येत्या चार दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत .
5/8
मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात पावसाचा जोर अधिक राहणार आहे .
6/8
पावसाचा इशारा असला तरी आज बहुतांश महाराष्ट्रात कमाल तापमानाचा पारा हा 37 ते 40 अंशापर्यंत होता .
7/8
येत्या दोन दिवसात कमाल तापमानात फारसा बदल होणार नसला तरी कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचे तापमान येत्या दोन ते तीन दिवसात हळूहळू वाढणार असल्याचं सांगण्यात आलंय .
8/8
संपूर्ण विदर्भात यलो अलर्ट, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली या जिल्ह्यांना आज येलो अलर्ट आहे .
Sponsored Links by Taboola