Maharashtra Uncertain Rain : राज्यात अवकाळी पाऊस, पिकांचं मोठं नुकसान
हिवाळा सुरु झाला तरी म्हणावी अशी थंडी आता जाणवत नाहीए. तापमानाचा पाराही चढताच आहे. त्यात मागील 2 दिवसांपासून पावसाच्या इशाऱ्यामुळे राज्यात काहीशी उकाड्याचीच स्थिती आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाल मंगळवारी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगलीत, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर विदर्भातील चंद्रपुरात पावसाच्या सरी बरसल्या.
साताऱा शहरासह महाबळेश्वर, पाचगणी, वाई परिसरात मुसळधार बॅटिंग केली. त्यामुळे साताऱ्यातील स्ट्रॉबेरी उत्पादकांना नुकसानाची भीती आहे.
तिकडे कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेड, दापोली, गुहागरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे काही काळ का होईना हवेत गारवा पाहायला मिळाला.
सिंधुदुर्गात अवकाळीच्या हजेरीमुळे झाडं, विजेचे खांब रस्त्यावर पडले तर काही घरांची कौल उडून गेल्यानं संसार उघड्यावर आले.
सिंधुदुर्गात अवकाळीच्या हजेरीमुळे झाडं, विजेचे खांब रस्त्यावर पडले तर काही घरांची कौल उडून गेल्यानं संसार उघड्यावर आले.
पावसाचं पाणी शेतात शिरलंय. ऐन काढणीला आलेल्या धान पिकाचं यामुळे मोठं नुकसान झालंय. शासनानं तातडीनं नुकसानभरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.