Maharashtra Temperature Today: दक्षिणेत पाऊस उत्तरेत बर्फ, महाराष्ट्रात हवामान पुन्हा बदलणार! पुण्यासह कुठे किती पारा?
गेल्या काही दिवसांपासून राज्यात प्रचंड थंडी जाणवत आहे. पुढील 4 दिवसात हवामान बदलणार आहे.
Continues below advertisement
Weather Update
Continues below advertisement
1/9
Maharashtra weather update: राज्यभरात किमान तापमानाचा पारा आता चांगलाच घटू लागलाय.
2/9
उत्तरेकडून येणाऱ्या गार वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात बोचरी थंडी जाणवू लागलीय. पण आता पुढील 4-5 दिवसात 2 ते 4 अंशाने किमान तापमानात वाढ होणार आहे.
3/9
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार सध्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. तर उत्तरेकडे थंडीच्या लाटेचे इशारे आहेत.
4/9
महाराष्ट्रात पुढील चार दिवसांमध्ये किमान तापमान वाढणार असून काही ठिकाणी पावसाचा अंदाज असल्याचाही सांगण्यात येत आहे.
5/9
सध्या किमान तापमान 8 ते 15 अंशांच्या दरम्यान स्थित आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हाडं गोठवणारी थंडी जाणवत आहे.
Continues below advertisement
6/9
तर मुंबई व कोकण भागात तुलनेने अधिक तापमान असले तरी या भागातही थंडी जाणवत आहे.
7/9
विदर्भात बहुतांश ठिकाणी 12 ते 14 अंशांच्या घरात तापमान आहे. अकोला १२.८ अमरावती 12.7 ब्रह्मपुरी 14.5 यवतमाळ 11.6 नागपूर 12.2 अंशांवर आहे.
8/9
मध्य महाराष्ट्रात नगरमध्ये आज 9.4 जळगाव 11.2 अंश तर जेरुर आठ अंशावर गेलंय. पुण्यात आज 11 अंश सेल्सिअसची नोंद झाली.तर महाबळेश्वर 12.4 अंशांवर आहे. नाशिक 9.8 सांगली 15.8 सातारा 13 सोलापूर 15.4 अंशावर आहे.
9/9
मराठवाडा छत्रपती संभाजीनगर शहरात 11.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.नांदेड 11 अंश धाराशिव 13.4 अंश तर परभणी 12 अंशावर आहे.
Published at : 20 Nov 2025 11:07 AM (IST)