Temperature Today:परभणी 42.4 अंश, पुण्यात किती? विदर्भात किंचित दिलासा, उकाड्याने नागरिक हैराण, आज कुठे काय पारा? Photos

राज्यात येत्या काही दिवसात पावसासह उष्णतेच्या लाटांचे इशारे देण्यात आले आहेत. हवामान विभागाने आज किती तापमान नोंदवले गेले?

Maharashtra Weather Today

1/7
राज्यभरात उष्णतेचा पारा प्रचंड वाढला असून विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता देण्यात आल्याने प्रचंड उकाडाही वाढलाय.
2/7
मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रात दुपारी घराबाहेर पडणं आता असह्य वाटू लागले आहे. वृद्ध, लहान बालकांना उन्हाच्या तीव्र झळांनी हैराण केले आहे.
3/7
आज छत्रपती संभाजीनगरमध्ये 41.7 अंश तापमानाची नोंद झाली आहे. परभणीत 42.4 अंश तर बीड, धाराशिव 41.8 अंश तापमान गेले आहे.
4/7
पुण्यात आज 40.6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद होत आहे. अहिल्यानगरमध्ये 40.8 नंदूरबारमध्ये 43.4 अंश सेल्सियस एवढा गेलाय.
5/7
येत्या चार दिवसात विदर्भात पावसाची शक्यता असून मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे.
6/7
विदर्भात आज पावसाची शक्यता असून गडचिरोली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. उर्वरित जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आलाय. त्यामुळे तापमान काहीसे उतरले आहे.
7/7
पुणे, नांदेड, लातूर,धाराशिव, सोलापूर,सांगली कोल्हापूरातही आज हलक्या पावसाची शक्यता आहे.
Sponsored Links by Taboola