इतिहासातील अनेक चित्तथरारक प्रसंग रांगोळीतून साकारले
सांगलीतील शांतिनिकेतन लोकविद्यापीठमध्ये लोकोत्सवानिमित्त इतिहासातील अनेक चित्तथरारक प्रसंग रांगोळीतून रेखाटण्यात आले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्राच्या जाज्वल्य इतिहासाची महती सांगणार्या अनेक प्रसंगांना रांगोळीतून जीवंत करण्याचा प्रयत्न केला आहे.
राज्यातील नामांकित रंगावलकारांनी केली आहे.
महाराष्ट्राचे ज्येष्ठ विचारवंत आणि लोककलांचे गाढे अभ्यासक प्राचार्य डॉ. पी.बी.पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
शांतिनिकेतन लोकविद्यापीठ परिसरामध्ये बहारदार लोकोत्सव सुरु आहे.
रांगोळी प्रदर्शन हे या लोकोत्सवाचे आकर्षण असते. ऐतिहासिक प्रसंग हा यावर्षीचा रांगोळीचा विषय होता.
या स्पर्धेत महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गोवा राज्यातील नामांकित रंगावलीकार सहभागी झाले होते.
शांतिनिकेतनमध्ये रांगोळ्यांचे हे प्रदर्शन खुले ठेवण्यात आले आहे.