Maharashtra Rain : आजपासून पुढचे पाच दिवस राज्यात अवकाळीचा इशारा
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कधी उन्हाचा कडाका तर कधी अवकाळी पावसाची हजेरी लागल्याचे दिसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या पाच ते सहा दिवसांपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (unseasonal rains) धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
अशातच आजपासून पुढचे पाच दिवस राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात (Marathwada) पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पुन्हा गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
13 आणि 15 एप्रिल दरम्यान काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे.
विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र विद्रभात कुठेही गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली नाही.
मार्च महिन्यात राज्यातील सुमारे 28 जिल्ह्यांना अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा मोठा फटका बसला. त्यामुळं शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
मागील काही दिवसापासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळं मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाला मोठा फटफटका बसला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही द्राक्षाच्या बागांचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक भागात उभी पिकं आडवी झाली आहेत.