Maharashtra Political Crisis : कालपर्यंत मुख्यमंत्र्यांशी एकनिष्ठ, आज दादा भुसे आणि संजय राठोड शिंदेच्या कळपात
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे बंड शिवसेनेला महागात पडणार असून शिंदेंचा गट बुलंद होताना दिसतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकालपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या सोबत मुंबईत असलेले कृषीमंत्री दादा भुसे यांनी देखील शिंदे यांच्या गोटात गेले आहे.
एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक व विश्वासू समजले जाणारे संजय राठोड देखील गुवाहाटीला पोहचले आहेत
एकनाथ शिंदेंनी शिवसेनेला खिंडार पाडत आमदारांचा एक मोठा गट आपल्या पाठिशी उभा केल्यानंतर शिवसेनेच्या किल्ल्याचा एकेक बुरुज ढासळताना दिसत आहे.
शिवसेनेचे आणखी आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत. त्यापैकी कृषीमंत्री दादा भुसे यांच्यासह काही आमदार गुवाहाटीत दाखल झाले आहे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेशी संवाद साधत आपल्या मनातील खदखद सगळ्यांसमोर मांडली. शिंदे यांना उद्देशून ही त्यांनी भावनिक साद घातली. मात्र त्याचा काहीही परिणाम होताना दिसत नाही.
उद्धव ठाकरेंच्या आवाहनानंतर देखील काही आमदार, शिंदे यांच्या गोटात दाखल होत आहेत. ही संख्या वाढतच चालली असल्याने शिवसेना एकटी पडत चालल्याचे चित्र आहे.
कालपर्यंत मुंबईत असलेले दादा भुसे आज सकाळपासून नेमके कुठे? आहेत याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात होता. भुसे देखील शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांवर अखेर शिक्कामोर्तब झाले
कृषीमंत्री दादा भुसे नाशिकमधील आमदार असून ते गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेशी जोडलेले आहेत. नाशिकमधील कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.